फॅक्ट चेक: तिरुपती मंदिराला भेसळयुक्त तूप पुरवणारी मुस्लिमांची कंपनी?
तिरुपती बालाजी मंदिराच्या प्रसादात बीफ फॅट आणि फिश ऑइल सारखे पदार्थ सापडल्याच्या बातम्या येत असतानाच सोशल मीडियावर यासंदर्भातील अनेक दिशाभूल करणारे दावे व्हायरल होत आहेत.
काय आहे दावा?: मंदिराला तूप पुरवणाऱ्या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे यात दाखविल्याचा दावा करण्यासाठी खालील स्क्रीनशॉट प्रसारित केला जात आहे. कंपनीचे व्यवस्थापन मुस्लीम समाजाचे आहे, असे यातून स्पष्ट होते.
या पोस्टला प्लॅटफॉर्मवर एक लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले होते, त्याआधी युजरने ती हटवली होती. (अशा अनेक पोस्टचे आर्काइव्ह येथे, येथे, येथे आणि येथे मिळू शकतात.)
हा दावा खरा आहे का?: नाही, हा दावा खोटा आहे. व्हायरल पोस्टमध्ये एआर डेअरी फूड प्रायव्हेट लिमिटेड या भारतीय कंपनीत काम करणाऱ्या लोकांची नावे दिसत नाहीत.
-
त्यात ‘एआर फूड्स (प्रायव्हेट) लिमिटेड’ या पाकिस्तानी कंपनीसाठी काम करणाऱ्या व्यक्तींची नावे दाखवण्यात आली आहेत.
-
तिरुपती बालाजी मंदिरासाठी तूप पुरवठा करणारी भारतीय कंपनी तामिळनाडूतील डिंडीगुल येथे आहे.
-
मात्र, आंध्र प्रदेशात तेलगू देसम पक्षाचे (TDP) सरकार स्थापन झाल्यानंतर कर्नाटक दूध संघाच्या नंदिनी घीचा प्रसादासाठी वापर केला जात आहे.